Deprecated: Unparenthesized `a ? b : c ? d : e` is deprecated. Use either `(a ? b : c) ? d : e` or `a ? b : (c ? d : e)` in /home4/agastkox/public_html/nabsspalaskheda.com/system/helpers/url_helper.php on line 162
Nisargopchar Ayurvedic Bahuuddeshiy Shikshan Sanstha

निसर्गोपचार आयुर्वेदिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेविषयी

निसर्गोपचार हि संस्था २०११ पासुन नोंदणीकृत झाली आहे.या संस्थेचे संस्थापक डॉ.मछिंद्रराव आगवन पाटील यांना ३ पिढयांचा निसर्गोउपचार या क्षेत्रात वारसा लाभलेला आहे. आतापर्यंत २ लाखाहून जास्त लोकांना ह्या संस्थेने निसर्गोपचार पद्धतीने उपचार करून बरे केले आहे. निसर्गोउपचार हा पूर्वीपासून आतापर्यंत चालत आलेला प्रभावी उपचार आहे. कुठलीही औषधी वनस्पती शिवाय बनूच शकत नाही असा या संस्थेचा विश्वास आणि ते त्यावर ठाम आहे. सर्व सजीव सृष्टीची निर्मिती ही निसर्गापासुनच होते. जसे निसर्गाने जेवढे जीवात्मे तयार केलेले आहेत,त्यांचे खाद्यसुद्धा निसर्गाने तयार केलेले आहेत. तसेच जेवढे रोग असतात,तेवढ्या वनस्पतीं सुद्धा निसर्गाने निर्माण केलेल्या असतात.परंतु ज्ञात म्हणजे सर्वाना माहीत नसतात.

प्रत्येक वनस्पतीमध्ये कुठला ना कुठला गुणधर्म असतो हे नक्की आहे. निसर्गोउपचार म्हणजे निसर्गनिर्मित वनस्पतीतून प्रत्येक रोगाला समूळ नष्ट करण्याची ताकद वनस्पतीमध्ये निसर्गाने दिलेली आहे. म्हणून निसर्गोउपचार पद्धती ही पूर्वीपासून चालत आलेली पॅथी असुन सर्वांना सोपी आहे.

संस्थेचा उद्देश हा आहे की सर्वसाधारण व्यक्ती ऍलोपॅथी व इतर महागडे उपचार करू शकत नाही,किंवा ते उपचार करूनही बऱ्याचवेळा हवा तो परिणाम दिसत नाही. अशा लोकांसाठी संस्था प्रामुख्याने सेवा देण्याचे काम करते. गोरगरीब व गरजु लोकांचा हि संस्था मोफत इलाज करते.

संस्थेचे उद्दिष्टे

आरोग्य विषयक कार्यक्रम राबवणे. संस्ठेमार्फत आयुवेदिक व निसर्गउपचार पद्धतीचा प्रचार व प्रचार करणे. त्यासाठी ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करणे. समाजात जनजागृती करणे. मोफत आयुवेदिक व निसर्गउपचार केंद्र सुरु करणे संस्ठेमार्फत आयुवेदिक वनस्पतीची लागवड करणे.
विद्यालये , महाविद्यालये,पदवी /पदविका महाविद्यालये सुरु करून सामान्यांच्या घरादारापर्यंत शिक्षण पोहचवणे. उर्दू, मराठी बालवाडी, अंगणवाडी, आश्रमशाळा, वसतिगृह, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी आवश्यक त्या भाषेत सुरु करणे वाचनालय सुरु करणे वृद्धाश्रम, अनाथआश्रम, महिलाश्रम, अल्पकालीन वसतीगृह, बालसंस्कार केंद्र स्थापन करणे, प्रौढ शिक्षणवर्ग चालवणे. यो-यु-चांग मार्शल चे प्रशिक्षण केंद चालवणे. व्यवसायभिमुख विषय प्रशिक्षण केंद चालवणे. व्यायामशाळा प्रशिक्षण देणे.
विधवा ,परीत्यकत्या, निराधार महिल्यांच्या पुनरसानासाठी पर्यंत करणे ,महिलांना स्वालंबी करण्यासाठी महिलांना बचतीचे महत्त्व समजावून सांगणे, आरोग्य केंद्र चालवणे .
युवकांना रोजगाराभिमुख्न व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.युवकांना रोजगाराची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरु करणे. युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करणे .आरोग्यासाठी योग शिबिरांचे आयोजन करणे .
सेंद्रिय खाते, गांडूळ खते याविषयी कृषी विज्ञान केंद्रा मार्फत शेतकर्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करणे, समाजातील गरीब व आजारी रुग्णांना वैद्यकिय मदत मिळवून देणे .रुग्णालय उघडणे .
तरक्की उर्दू ब्युरो, नवी दिल्ली भाषांतर व विकासासाठी व प्रसारासाठी संबंधित संस्थेची वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन भाषांचा विस्तार प्रसारण करणे. पोलीस भरती व सेना भरतीसाठी मार्ग्दर्शन वर्ग चालविणे .पराईवेट सेक्युरीटी गाडीला मार्गदशन करणे .
कुटुंब कल्याण, वृक्षारोपण, दारूबंदी, हुंडा बंदी, अंधश्रध्दा निर्मुलन, महिला व बालकल्याण, अपंग कल्याण, राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम राबविणे. आरोग्य विषयक ग्राम स्वच्छता, लोकसंख्या नियंत्रण या बाबत चर्चासत्र आयोजित करणे.
दवाखाने, रुग्णालये सुरु करणे, ब्लड बँक सुरु करणे. नर्सिंग कॉलेज सुरु करणे. एड्स, कॅन्सर अशा रोगांबाबत माहिती देणे. व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविणे. औषधी वनस्पतीबाबत संशोधन करणे.
सर्व समाजातीलगरीब, दिन दुबळ्या लोकांच्या विकासासाठी संस्थेमार्फत सर्व प्रयत्न व सहकार्य करणे.